विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम हल्ल्यात राज्यातील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक देखील पुन्हा परत कसे जायचे याची वाट पहात आहेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील पर्यटकांचे मृतदेह आणि त्यांचा नातेवाईकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष विमानाने त्यांना महाराष्ट्रात आणले जाणार आहे. pahalgam attack
एकनाथ शिंदे यांनी मृत्युमुखी पडलेले पर्यटक आणि त्यांच्या कुटूंबियांना राज्यात परत आणण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमान सोडण्याची विनंती शिंदे यांनी नायडू यांना केली. ही विनंती मान्य करत लवकरात लवकर तिथे अडकलेल्या पर्यटकांची यादी दिल्यास त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्याची सोय करू, असे आश्वासन नायडू यांनी शिंदे यांना दिले. त्यामुळे आता जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून ही यादी मिळवून लवकरच सर्वांना परत आणण्याची सोय करण्यात येणार आहे.
याबाबत शिंदे यांनी केलेली विनंती मान्य करून विशेष विमानाने या सर्वांना राज्यात परत आणले जाईल.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले की, काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड गोळीबार केला. त्यात 27 पर्यटकांचे प्राण गेले. या क्षणाला माझ्या मनात संताप, दु:ख, वेदना आहेत. निरपराध पर्यटकांचे हकनाक रक्त तिथे सांडलंय. असल्या भ्याड कुरापती करणारे अतिरेकी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानची मस्ती उतरवली जाईल.
नि:शस्त्र पर्यटकांवर हल्ले करण्यात फुशारकी मारणं हे हिजडेपणाचं लक्षण आहे. हा खेळ पाकड्यांनी सुरु केला असला तरी त्याचा दि एण्ड भारतीय जवान समर्थपणे करतील. कारण नवा भारत हा ‘घुसके मारेंगे’ असं सांगून आरपार घुसवणारा आहे, हे त्यांना लवकरच कळेल. मी या हल्ल्याचा कडाडून धिक्कार करतो. हा अतिरेक्यांचा डाव कधीही सफल होणार नाही. मी मृत पर्यटकांना श्रध्दांजली वाहतो. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. त्यांच्या आप्तांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरि सहाय्य केले जाईल.
Tourists from the state affected by the Pahalgam attack will be brought to Maharashtra by a special flight
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली