विशेष प्रतिनिधी
नाशिक : Hussain Dalwai नाशिकच्या काठे गल्लीतील सातपीर दर्गा न्यायालयाने अनधिकृत ठरवलेला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दर्गा ३५० वर्षांपूर्वीचा आहे. या दर्ग्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. दंगा करणाऱ्यांचे ऐकल्यानेच दंगल झाली आहे. पोलिसांनी महिला आमदारांना अटक केली पाहिजे. महिला आमदारांनी दर्ग्याला थडगं म्हणणे चुकीचे आहे. थडगं आणि दर्ग्यात फरक आहे. स्थानिक आमदार अपराधी आहेत. जे अपराधी आहेत त्यांना पकडावे. पोलिसांना कोणालाही घाबरू नये, अशी म्हणू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.Hussain Dalwai
दलवाई म्हणाले की, मी गांधीवादी असून हिंसेचे समर्थन करत नाही. मी काही गोळवलकरवादी किंवा सावरकरवादी नाही. मी अहिंसावादी आहे. दगडफेक मला मान्य नाही. मी दंगा करणारा माणूस नाही. महाराष्ट्र शिवाजी महाराजाचा आहे. महाराजांनी सर्वांना बरोबर घेत राज्य निर्माण केले. आता ही परंपरा तोडण्याचे काम केले जात आहे. जे व्यवस्था बिघडवण्याचा काम करतात. त्यांना सूट दिली जात आहे. पाच लोकांसोबत दर्गा असलेल्या ठिकाणी जाणार होतो पण पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्या ठिकाणी प्रार्थना करू दिली नाही. नाशिक कुंभमेळा चांगल्या रितीने झाला पाहिजे. चांगले वातावरण करण्याऐवजी बिघडवले जात आहे.
नाशिक दंगलीप्रकरणात काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. त्यांना अटक होणार असून, त्यांना वाचवण्यासाठी माजी खासदार हुसेन दलवाई पुढे आले असावेत. दलवाई हे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, असे मत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले.
व्दारका भागातील काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्ग्याचे बांधकाम अतिक्रमण जागेत असल्याने महापालिकेने २३ फेब्रुवारी २०२५ रोजी कारवाई केली. या संदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर फेब्रुवारीमध्ये नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या दर्गा भोवतीचे काही अतिक्रमण काढले होते. गतआठवड्यात महापालिका आणि पोलिसांनी दर्ग्याचे अतिक्रमण काढले. दरम्यान, संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आमदार प्रा. फरांदे म्हणाल्या की, गोरगरीबांची माथी भडकवून दंगल घडवण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानेच अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्यात आली आहे. हुसेन दलवाई यांनी समाजकारण आणि राजकारण शिकवू नये. आम्ही संविधान मानणारे आहोत.
Arrest MLAs who call dargah a tomb, demands Hussain Dalwai
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली