विशेष प्रतिनिधी
Pune News: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे (Kaustubh Ganbote) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे या दोघांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले आणि परिसरात शोककळा पसरली.
कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने हल्ल्यावेळी घडलेला अनुभव अत्यंत भावुक शब्दांत मांडला. “हल्लेखोरांनी अजान वाचता येते का, असं विचारत आमच्यावर ओरडायला सुरुवात केली. आम्ही सगळ्या महिलांनी घाबरून आमच्या कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या आणि मोठ्या आवाजात अजान म्हणण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी आमच्या माणसांवर गोळ्या झाडल्या,” असे त्या सांगतात.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कौस्तुभ गनबोटे यांच्या पुण्यातील घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
गनबोटे यांच्या पत्नीने अजूनही अनेक कटू आणि हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या. “त्या ठिकाणी एक मुस्लिम व्यक्ती आमच्यासोबत होता. त्याने दहशतवाद्यांना विचारले की, ‘तुम्ही निरपराध लोकांना का मारता?’ पण त्यालाही पुढे करून गोळ्या घालण्यात आल्या. आमचे घोडेवालेसुद्धा मुस्लिम होते. त्यांनी आम्हाला वाचवण्यासाठी धाव घेतली. काही स्थानिक लोकांनी, तसेच सैन्य दलाने आम्हाला मदत केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती… आमची माणसं गेली होती.”
Ajaan was said, bindis were removed… still they shot him, heartbreaking experience of Kaustubh Ganbote’s wife
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली