विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर देशातील मुस्लिम संघटनांनी (Muslim Organizations) संताप व्यक्त करत पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली आहे. जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्यात एका विदेशी नागरिकासह 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.
दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू नागरिकांसह मुस्लिमांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. निदर्शने करणाऱ्या मुस्लिमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बॉर्डरवर जाण्याची मागणी केली आहे.
मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने अतिशय भ्याड कृत्य केलं आहे. हा पाक नाही तर हा नापाक देश आहे. त्यामुळे आम्ही भारताच्या पंतप्रधानांना सांगतोय की, त्यांनी बदला घ्यावा. दहशतवाद्यांनी कलमा वाचायला सांगत हिंदू आहे की मुस्लिम? असे विचारले आणि गोळ्या झाडल्या. हे दहशतवादी मुस्लिम असूच शकत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदींकडे विनंती करतो की, त्यांनी आम्हाला बॉर्डरवर जाण्याची परवानगी द्यावी. आम्ही बॉर्डरवर जाऊन धर्म विचारणाऱ्या दहशतवादी मुस्लिमांना जय श्रीरामचे नारे देऊन मारू. कारण त्यांनी आमच्या हिंदुस्तानी भावांना मारलं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम संघटनांनी केली.
मुस्लिम संघटनांनी म्हटले की, आम्हाला मोदींवर गर्व आहे. त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा. हिंदुस्तानच्या नक्शावरून पाकिस्तानचं नाव निघून गेलं पाहिजे. पाकिस्तानचा नायनाट करावा. पाकिस्तानला मुळापासून नष्ट करावं. पाकिस्तानची जमीन नापाक आहे. तिथे दहशतवाद्यांचा जन्म होतो, तिथे त्यांना पाळलं जात आहे. भारतीयांना ज्या जमिनीवर मारलं आहे, त्याच जमिनीवर दहशतवाद्यांना पकडल्यानंतर गोळी घालावी, अशी मागणी देखील मुस्लिम संघटनांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
Teach Pakistan a lesson, demand Muslim organizations
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत