विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आसाममधील एआययूडीएफ (AIUDF) पक्षाचे आमदार अमिनुल इस्लाम यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. अमिनुल इस्लाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर या हल्ल्यामागे कट असल्याचा आरोप केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
धिंग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार इस्लाम यांनी स्थानिक पंचायत निवडणुकांच्या प्रचारावेळी हे विधान केले. त्यांनी म्हटलं होतं की, “२०१८ मधील पुलवामा हल्ल्यामागेही केंद्र सरकारचा हात होता, त्यातून ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. त्या घटनेचा राजकीय फायदा घेत भाजपने २०१९ ची निवडणूक जिंकली. मी त्यावेळी चौकशीची मागणी केली होती, पण काहीच झालं नाही. आता पाहलगाम हल्ल्याबाबतही केंद्र सरकारवरच संशय येतोय.”
त्यांनी हेही सांगितलं की, दहशतवाद्यांनी कोणाचाही धर्म विचारला नाही, अंधारात अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, प्रत्यक्षात हल्ला broad daylight मध्ये झाला होता आणि घटनास्थळी उपलब्ध व्हिडीओ व अनेक जिवंत साक्षीदारांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हल्ल्याआधी पर्यटकांचा धर्म विचारूनच हत्या केली होती.
या विधानामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर गुरुवारी सकाळी पोलिसांनी नगाव जिल्ह्यातील धिंग येथील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केली. त्यांना पुढील चौकशीसाठी गुवाहाटी येथे हलवण्यात येत आहे.
AIUDF MLA Aminul Islam arrested for accusing PM over Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत