Ramdas Kadam रामदास कदम म्हणाले, २०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही

Ramdas Kadam रामदास कदम म्हणाले, २०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये तणाव असल्याची चर्चा सध्या विराेधकांकडून केली जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जाते. मात्र, शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने यावरून काेणीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यात मतभेद हाेणार नाहीत, असे स्पष्ट करत २०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही, असे ते म्हणाले.

महायुतीला २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो असे यश मिळाले. त्यातही भाजपा पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु, यानंतर शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक टप्प्यांवर महायुतीत मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत असलेली धुसपूस अद्यापही शमलेली नाही. यातच महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकित केले. का सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.

यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. २०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही. आमच्या देवेंद्रजींनाही शुभेच्छा आहेत, बावनकुळेंनाही शुभेच्छा आहेत. एकनाथ शिंदेंनाही शुभेच्छा आहेत. आम्ही सगळे एक आहोत. कुणीही आग लावायचा प्रयत्न केला तरीही आमच्यात मतभेद होणार नाहीत.

दरम्यान, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला गेले. यावरून महायुतीत श्रेयवाद सुरू झाल्याची टीका होऊ लागली. यावरही बावनकुळे यांनी उत्तर दिले. पर्यटकांना सुखरूप आणण्याच्या प्रयत्नाला कोणी श्रेयवाद म्हणत असेल तर दुर्दैवाची बाब आहे. यात राजकारण करणे योग्य नाही.

Ramdas Kadam said, we have no problem even if Devendra Fadnavis remains Chief Minister till 2080

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023