Modi government : मोदी सरकारची उत्तुंग कामगिरी, १७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल भारताचे जागतिक बँकेकडून कौतुक

Modi government : मोदी सरकारची उत्तुंग कामगिरी, १७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल भारताचे जागतिक बँकेकडून कौतुक

Modi government

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Modi government भारताने गेल्या दहा वर्षात गरीबी निर्मूलनात मोठे यश मिळवले आहे. १७ कोटी म्हणजेच १७१ दशलक्ष लोकांना अति-गरीबीच्या रेषेखालून वर काढण्यामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल जागतिक बँकेने भारताचे मोठे कौतुक केले आहे. यासोबतच रोजगार वाढीचा दरही कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याची नोंदही बँकेने घेतली आहे.Modi government

एप्रिल २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘पाव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ या अहवालात जागतिक बँकेने नमूद केले की, भारतातील अति-गरिबी (प्रति दिवस $2.15 पेक्षा कमी उत्पन्न) २०११-१२ मध्ये १६.२ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये केवळ २.३ टक्क्यांवर आली आहे. ग्रामीण भागात ही घसरण अधिक ठळक असून १८.४ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांवर आली आहे, तर शहरी भागात ही टक्केवारी १०.७ वरून १.१ टक्क्यांवर आली आहे.

या घसरणीमुळे ग्रामीण व शहरी भागातील गरिबीमधील फरक ७.७ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे – म्हणजेच वार्षिक १६% इतकी तफावत घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

भारत आता ‘लोअर मिडल इन्कम कंट्रीज’ या वर्गवारीत गेला असून, $3.65 दररोज उत्पन्नाच्या आधारावर मोजली जाणारी गरिबी ६१.८ टक्क्यांवरून २८.१ टक्क्यांवर आली आहे. यामुळे एकूण ३७८ दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश – या पाच राज्यांनी २०११-१२ मध्ये भारतातील एकूण अति-गरीबांपैकी ६५ टक्के वाटा उचलला होता. २०२२-२३ मध्ये ही टक्केवारी ५४ वर आली आहे.

२०२१-२२ पासून भारतात रोजगार वाढीचा वेग कार्यक्षम वयोगटापेक्षा अधिक आहे. शहरी बेरोजगारी २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत ६.६% इतकी आहे, जी २०१७-१८ पासून सर्वात कमी आहे. मोदी सरकारने महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखल्या. उद्योजकतेसाठी प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागात महिला रोजगारात वाढ झाली असून शहरी भागात पुरुष कामगारांची संख्याही वाढत आहे. युवक बेरोजगारी मात्र १३.३% असून, पदवीधरांमध्ये ती २९% आहे.ग्रामीण महिलांमध्ये स्वरोजगार वाढत असून, महिला रोजगारदर ३१% आहे. तरीही भारतात सध्या २३४ दशलक्ष पुरुष पगारी कामात कार्यरत आहेत, जे महिलांच्या तुलनेत खूप अधिक आहे.

या निष्कर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच लक्ष वेधले होते. त्यांनी फेब्रुवारीत लोकसभेत सांगितले होते की, गेल्या दहा वर्षांत २५ कोटी नागरिकांनी गरिबीवर मात केली आहे.

अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास, शहरीकरण, शेती व उद्योग धोरणे, आर्थिक समावेशन आणि धोरणात्मक हस्तक्षेप यांच्या साहाय्याने भारताने गरिबीविरुद्ध मोठी झेप घेतली आहे. गरिबीतून कोट्यवधी नागरिकांना वर काढणे ही एक ऐतिहासिक कामगिरी मोदी सरकारने केली आहे.

Modi government’s outstanding performance, India praised by World Bank for lifting 17 crore people out of poverty

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023