विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Tulsi Gabbard जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेच्या राजकारणी आणि नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर तुलसी गॅबर्ड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या हल्ल्यासाठी इस्लामी दहशतवाद जबाबदार असल्याचे स्पष्टपणे म्हटले. अमेरिकेचा भारताला संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Tulsi Gabbard
“पहलगाममध्ये हिंदूंना लक्ष्य करत करण्यात आलेल्या भयानक इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत उभे आहोत. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणि भारतातील सर्व जनतेसाठी माझ्या प्रार्थना आणि सहवेदना आहेत,” असे गॅबर्ड यांनी ट्विटमध्ये नमूद केले. या अमानवी कृत्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आम्ही संपूर्ण पाठिंबा देतो,” असेही त्या म्हणाल्या.
पहलगाम येत बैसरान व्हॅलीजवळ झालेल्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि २० हून अधिक जखमी झाले. २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा आणि क्रूर हल्ला मानला जात आहे.तुलसी गॅबर्ड यांच्या या प्रतिक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेबाबतची चिंता अधोरेखित झाली आहे. भारताच्या लढ्यात एकजूट दाखवणाऱ्या देशांची संख्या वाढत आहे.
Find the terrorists, we have full support, US’s Tulsi Gabbard’s strong reaction to the Pahalgam terrorist attack
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला