विशेष प्रतिनिधी
भोपाळ : Bhopal ‘केरळा स्टोरी’ चित्रपटात दाखवलेल्या घटनांप्रमाणेच एक धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील भोपाळ येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात तीन हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांनी खोट्या नावाने फसवले, अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले आणि नंतर इस्लाममध्ये धर्मांतरासाठी दबाव टाकला, असा आरोप आहे.Bhopal
भोपाळच्या एका खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या फरहान खान, साहिल खान आणि अली खान या तिघांविरोधात बलात्कार, पोस्को कायदा आणि मध्यप्रदेश धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही एमबीएचे विद्यार्थी असून पीडित मुली त्याच कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहेत.
फरहान खानने सुरुवातीला एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचा अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यावरून तिला धमकावू लागला. नंतर फरहानने तिला तिच्या मैत्रिणींना साहिल व अलीशी भेटण्यास भाग पाडले.
या दोघांनीही संबंधित मैत्रिणींना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून पहिल्याच भेटीत अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यानंतर त्यांच्यावर सतत धर्मांतराचा आणि निकाहाचा दबाव टाकत राहिले.
आरोपी दररोज पैसे मागू लागले आणि ब्लॅकमेलिंग अधिक वाढू लागल्याने एका पीडित तरुणीने बागसेवानिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने सांगितले की तिच्या दोन मैत्रिणींसोबतही हाच प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी दोघी मुलींचे समुपदेशन करून त्यांच्या जबाब नोंदवले. तपासात समोर आले की, अली खानने अशोक गार्डन येथील एका हॉटेलमध्ये आणि साहिल खानने जहांगिराबादमधील खोलीत एका मुलीसोबत संबंध ठेवले. त्यामुळे संबंधित दोन्ही पोलीस ठाण्यांतही गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी फरहान आणि साहिल यांना अटक करून पोलीस कोठडीत पाठवले आहे, तर अली खान अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. फरहानच्या मोबाईलमध्ये इतर अनेक मुलींचे फोटो आढळून आले आहेत, त्यामुळे आणखी बळी पडलेल्या मुली असल्याची शक्यता आहे.
तपासात समोर आले की आरोपींपैकी दोघे पश्चिम बंगालचे असून मध्यप्रदेशचे नाहीत. त्यामुळे हा आंतरराज्यीय टोळीचा भाग असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे.
In Bhopal, Hindu girls are raped and pressured into conversion by trapping them in the love trap like ‘Kerala Story’
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला