विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : Eknath Shinde जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी स्थानिक युवक सय्यद आदिल हुसैन शाह याने पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर आदिल शाह याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. घरातील एकटा कमावता असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिलच्या कुटुंबाला घर बांधून देणार आहेत.Eknath Shinde
काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. पर्यटकांना खच्चरवरून ने -आण करणाऱ्या आदिल सय्यद हुसेन याचाही या घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार केला, तेव्हा त्याला आदिलने विरोध केला होता. त्याने दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. त्याच्यावर देखील गोळीबार करण्यात आला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आदिल हुसेनच्या कुटुंबाशी संवाद साधला, तसेच त्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
आदिल हुसैन घोड्यावरुन पर्यटकांना सफर घडवायचा. त्यानं एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. सय्यद आदिल हुसैन शाह पर्यटकांना कार पार्किंग पासून बैसारन म्हणजेच मैदानापर्यंत घेऊन जायचा. सय्यद आदिल हुसैन शाह यानं दहशतवाद्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली. आदिल हुसैन शाह यानं त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
Eknath Shinde will build the house for Adil Hussain famiy in Pahalgam
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला