विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी हिंदू प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी सुमारे २० जणांच्या पँट खाली ओढल्या किंवा झिप उघडली, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
संयुक्त तपास पथकाच्या अहवालानुसार, दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान पीडितांची नावे आणि धर्म विचारला. त्यानंतर ‘कलमा’ म्हणण्यास सांगितले. जे प्रवासी कलमा म्हणू शकले नाहीत, त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. याशिवाय, ओळखपत्रांची तपासणी आणि शरीराबाबतची पडताळणी करून हिंदू असल्याची खात्री घेतली जात होती. इस्लामी परंपरेनुसार सुंता अनिवार्य असल्याने, या आधारावर पीडितांचा धर्म निश्चित केला जात होता.
या हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांना ठार मारण्यात आले. घटनास्थळी लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त तपास सुरू केला असून आतापर्यंत सुमारे १५०० संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी ७० जणांवर विशेष संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने लवकरच हल्ल्याचे मुख्य सूत्रधार गजाआड करण्याचा दावा केला आहे.
हल्ल्यातून बचावलेले आसाम विद्यापीठाचे प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांनी कलमा उच्चारल्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांना सोडून दिले. मात्र पुण्यातील संतोष जगदाळे यांना कलमा म्हणण्याची मागणी केली असता, ते तसे करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्या डोक्याच्या मागे आणि पाठीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
दरम्यान, बंगळुरूचे भारत भूषण यांच्यावर त्यांच्या पत्नी आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलासमोरच गोळ्या झाडण्यात आल्या, अशीही दुर्दैवी माहिती समोर आली आहे.
Pahalgam Terror Attack 20 tourists’ pants pulled down to identify religion, shot after confirming they were Hindus
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला