विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी कोणत्याही संरक्षण कारवाया अथवा सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण किंवा प्रत्यक्ष माहिती देऊ नये, असा सल्ला माहिती व प्रसारण (I&B) मंत्रालयाने शनिवारी सर्व मीडिया संस्थांना दिला आहे.
या सल्ल्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, संरक्षण कारवाया किंवा सैन्याच्या हालचालींशी संबंधित कोणतीही रिअल टाइम माहिती, दृश्ये किंवा “स्रोताधारित” अहवाल प्रसारित करू नये. संवेदनशील माहितीची अकाली प्रसारण विघातक घटकांना मदत करू शकते आणि ऑपरेशनल कार्यक्षमता तसेच जवानांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो, असे मंत्रालयाने सांगितले.
मंत्रालयाने यावेळी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, कारगिल युद्ध आणि कंदहार अपहरण प्रसंगाचा उल्लेख करत, त्या वेळी मीडिया कव्हरेजमुळे राष्ट्रीय हिताला कशा प्रकारे नुकसान झाले होते, हे दाखवून दिले.
“कारगिल युद्ध, मुंबईवरील २६/११ हल्ला आणि कंदहार विमान अपहरण अशा घटनांमध्ये राष्ट्रीय हितावर प्रतिकूल परिणाम झाला होता,” असे सल्ल्यात नमूद आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम आणि पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलली आहेत. त्यामुळे मंत्रालयाने सर्व मीडिया संस्थांनी, न्यूज एजन्सींनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी, संरक्षणविषयक संवेदनशील घटना हाताळताना सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षेला कोणतीही बाधा निर्माण होणार नाही.
Avoid live broadcasting of defence operations, Ministry of Information and Broadcasting advises media houses
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला