Wang Yi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा; भारतालाच संयम राखण्याचे आवाहन

Wang Yi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा; भारतालाच संयम राखण्याचे आवाहन

Wang Yi

विशेष प्रतिनिधी

बीजिंग/नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना, चीनने रविवारी पाकिस्तानच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या हक्कांना पाठिंबा दिला. पाकिस्तानची री ओढत उलट भारतानेच संयम राखावा, असे आवाहन चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी केले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वांग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. वांग यी म्हणाले की, “चीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, याला समर्थन देतो.”

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाच्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या गटाने स्वीकारली आहे.



भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सिंधू नदी कराराच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती आणि अटारी सीमावर्ती प्रवेशबिंदू बंद करणे यांचा समावेश आहे. पाकिस्तानने मात्र नदीचे पाणी थांबवल्यास ‘युद्धाची कृती’ मानली जाईल असा इशारा दिला आहे आणि प्रत्युत्तर म्हणून भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची व व्यापार थांबवण्याची घोषणा केली आहे. Wang Yi

चीनने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, “चीन नेहमीच पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी धाेरणाला पाठिंबा देतो. पाकिस्तानचे सुरक्षाविषयक योग्य मुद्दे आम्हाला समजतात आणि आम्ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्व व सुरक्षेच्या रक्षणाला पाठिंबा देतो. त्यामुळे दोन्ही देशांनी संयम राखावा. एकमेकांशी चर्चा करावी व परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न करावेत. Wang Yi

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, डार यांनी भारताच्या “एकतर्फी आणि बेकायदेशीर” कृतींना विरोध दर्शवला आणि भारताकडून पाकिस्तानविरोधात चालवलेल्या “खोट्या प्रचाराचा” निषेध केला. डार यांनी चीनच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि दोन्ही देशांमधील “सर्वकालिक सामरिक सहकार्याचे” दृढीकरण करण्याचा नवा संकल्प व्यक्त केला. Wang Yi

गेल्या काही दिवसांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इराणचे अध्यक्ष मसूद पझेश्कियन आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा केली असून, या सर्वांनी भारतातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

China’s support to Pakistan after Pahalgam terror attack; Appeal to India itself to maintain restraint : Wang Yi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023