विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : Assam जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, आसाममध्ये देशविरोधी भावना पसरवणाऱ्या १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी दिली.Assam
मुख्यमंत्री सरमा यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, “२७ एप्रिल रोजी देशद्रोही प्रवृत्तीविरोधात कारवाई सुरू आहे. दधीची डिंपल उर्फ डिंपल बोरा हिला गोलाघाट पोलिसांनी अटक केली. ताहीब अलीला तमुलपूर पोलिसांनी अटक केली आणि बिमल महातोला उदालगिरी पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे. करीमगंज पोलीस ठाण्यांतर्गत सायकूट गावातील कबीर अहमद याचा मुलगा मुस्ताक अहमद उर्फ साहेल याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असा फेसबुकवर पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.”
याआधी शनिवारी मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले होते की, “आसाममध्ये कोणत्याही व्यक्तीला, जो थेट किंवा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला समर्थन देतो किंवा बचाव करतो, त्याला सहन केले जाणार नाही. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींवर आसाम पोलिसांनी कारवाई केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी अटकेतील काही नावेही जाहीर केली आहेत, त्यात मोहम्मद जबीर हुसेन (हैलाकांडी), मोहम्मद ए.के. बहाउद्दीन, मोहम्मद जावेद माजुमदार, मोहम्मद महाहर मियाँ उर्फ मुजीरूल इस्लाम, मोहम्मद अमिनुल इस्लाम आणि मोहम्मद साहिल अली यांचा समावेश आहे.
देशभरात २६ नागरिकांच्या बळी गेलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शोककळा पसरली असून, भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या सहकार्यांवर कठोर कारवाई होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आसाममधील स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायत) निवडणुका दोन टप्प्यांत २ मे आणि ७ मे रोजी होणार असून, मतमोजणी ११ मे रोजी पार पडणार आहे.
Action against those chanting “Pakistan Zindabad”; 16 arrested in Assam
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती