विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal पहलगाम हल्ल्याबाबत हिंदू म्हणून मारले का माहित नाही या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका हाेत आहे. मात्र, शरद पवारांचे जुने सहकारी आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पवारांच्या मदतीला धावून आले आहेत. हिंदू मुस्लीम वाद वाढता कामा नये यासाठी त्यांनी मुद्दाम ती गोष्ट टाळली. जाणीवपूर्वक ‘ते’ वक्तव्य केले, असे भुजबळ म्हणाले.Chhagan Bhujbal
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.दहशतवाद्यांनी पर्यटकांना धार्मिक ओळख विचारुन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं वक्तव्य शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावरुन महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांच्या नातेवाईकांना भेटा असा सल्ला शरद पवार यांना दिला होता. आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवार यांनी जाणीवपूर्वक तसे वक्तव्य केल्याचे सांगताना छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांना सगळे कळते. कोण काय बोललं हे त्यांना माहिती असते. पाकिस्तानला आपल्याला टक्कर द्यायची असेल तर हिंदू मुस्लीम वाद वाढता कामा नये यासाठी त्यांनी मुद्दाम ती गोष्ट टाळली. तोच पाकिस्तानचा प्रयत्न आहे. कारण आपल्या देशात २२ कोटी मुस्लम असतील. या सगळ्यांबरोबर आपण लढत बसलो तर बाहेरच्या लोकांबरोबर कसे लढणार? म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक तसे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्याचा प्रश्न नाही. त्यांना सगळं काही समजतं.
दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथे जी लोकं होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे, असे विधान शरद पवार यांनी केले होते.
Chhagan Bhujbal came to help of Sharad Pawar, said ‘that’ statement deliberately
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती