विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abu Azmi दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, कारण त्यांना हे चांगलं माहीत होतं की असं केलं तर भारतामध्ये हिंदू – मुस्लिम वाद निर्माण होईल, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी केले आहे. तरीही भारतातील मुसलमान लोकांना अशी वागणू का दिली जात आहे? असा सवालही त्यांनी केला. Abu Azmi
काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झालं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत, आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारने या दहशतवाद्यांविरोधात कठोर ॲक्शन घ्यावी अशी ते मागणी करत आहेत. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, कारण त्यांना हे चांगलं माहीत होतं की असं केलं तर भारतामध्ये हिंदू -मुस्लीम होईल. ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथील मुस्लीम बांधव बचावासाठी धावून आले, मदत कर्य केलं. मात्र भारतातील मुसलमान लोकांना अशी वागणू का दिली जात आहे? असा सवाल यावेळी आझमी यांनी उपस्थि केला.
ज्यांनी हिंदूंना मारले त्यांना मारा आम्हाला का त्रास देत आहात? मुंबईच्या दादरसह भारतात अनेक ठिकाणी मुस्लीम लोकांना मारहाण केली जात आहे. मी पंतप्रधान , सरकार, मोहन भागवत यांच्यासह सर्वांना विनंती करतो की जातीयवाद होऊ देऊ नका. यासंदर्भात एक पत्रक काढून आदेश देण्याची गरज आहे. सरकार ज्या गोष्टी आणत आहेत, त्या सगळ्या मुस्लिम विरोधात आहेत. वक्फ बोर्ड कायदा तोही मुसलमान विरोधात आहे, तो आम्हाला नको आहे. सगळे हिंदू मुस्लिम यांना लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही यावेळी आझमी यांनी केला आहे.
सगळ्यात मोठी बाब म्हणजे निवडून आलेले आमदार देखील अशी वक्तव्य करत आहेत. संविधानाची शपथ घेऊन नितेश राणे रत्नागिरीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला सांगत आहेत. हिंदू मुस्लीम करत आहेत, मी दोन वेळा नितेश राणे यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो. पत्रही दिले आहे. आता पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पत्र देणार आहोत, असेही आझमी म्हणाले.
Terrorists asked for religion to make India Hindu-Muslim, asserts Abu Azmi
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती