विशेष प्रतिनिधी
मुरगूड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ५५१ वी रँक मिळवणारा यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे (Birdev Done) याचे मूळगाव यमगेमध्ये प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. बिरदेवच्या यशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी मुरगूडपासून यमगेपर्यंत जंगी मिरवणूक काढली. बीरदेवच्या कौतुकासाठी जनसागर लोटला होता.
शिवतीर्थपासून सकाळी आठ वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल सहा तास चालली. बिरदेव यांच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बिरदेव व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.यूपीएससी परीक्षेचा निकाल २२ एप्रिलला दुपारी लागला. त्या दिवशी बिरदेव बेळगावजवळील भवानीनगर येथे माळावर आपल्या मामाच्या बकऱ्यांत रमला होता. गावकऱ्यांनी फोनवरून बिरदेवचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी बिरदेवच्या स्वागताची तयारी सुरू केली, पण बिरदेवने सैन्यात असलेला भाऊ वासुदेव येत नाही, तोपर्यंत गावात येणार नसल्याची इच्छा व्यक्त केली आणि रविवारी बिरदेव भावासह गावात आला आणि ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.सकाळी बिरदेव कर्नाटकातील झोडकूरळी या आपल्या बहिणीच्या गावाहून मुरगूडमधील शिवतीर्थ येथे दाखल झाला.
प्रारंभी औक्षण केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये बिरदेव आपले आई बाळाबाई, वडील सिद्धाप्पा, भाऊ, बिरदेव, बहीण व अन्य नातेवाईक होते. मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती. ही मिरवणूक यमगे एसटी स्टँड येथे आली. यमगेच्या प्रवेशद्वारात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अंबाबाई, डोमरीन व बिरोबा मंदिरांचे दर्शन घेऊन बिरदेवच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. बिरदेवच्या कौतुकासाठी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.भावासाठी मिरवणूक थांबवलीबिरदेव आपल्या आई-वडील व अन्य नातेवाइकांसह मिरवणुकीसाठी सजवलेल्या जीपमध्ये चढला.
मिरवणूक सुरू होणार इतक्यात आपला भाऊ वासुदेव जोपर्यंत गाडीत येत नाही तोपर्यंत बिरदेव यांनी मिरवणूक सुरू करू नका, असे आवाहन केले. अर्धा तासाने भाऊ आल्यानंतर मिरवणूक सुरू झाली…अन् बिरदेव ढसाढसा रडला..!मिरवणूक यमगेच्या प्रवेशद्वारात आली. याठिकाणी अबाल वृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. स्वागतासाठी इतकी प्रचंड गर्दी पाहून बिरदेवला गहिवरून आले आणि तो गावात प्रवेश करताना ढसाढसा रडला.कंबरेला ढोल बांधत बिरदेवने ढोल वाजवलाबिरोबा मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर देवदर्शन घेतल्यानंतर स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात ढोल वादक उपस्थित होते, त्यांच्यामध्ये जात बिरदेवने बिरोबाच्या नावांनं चांगभलं म्हणत ढोल कंबरेला बांधला आणि ढोल वाजवला.
Birdev Done procession in the presence of thousands in a decorated jeep
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती