विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : Pakistan’s पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकारची धास्ती वाढली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.Pakistan’s
ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘पाकिस्तानी लष्कराने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. आम्ही तयार आहाेत. आ पूर्ण पाकिस्तान अलर्ट मोडवर आहे. आमच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाला, तर आम्ही आमच्या अण्वस्त्रांचा वापर करू. आता लष्करी कारवाई जवळ आली आहे असे स्पष्ट दिसते. त्यामुळे आम्ही आमचे सैन्य अधिक सज्ज केले आहे. काही धोरणात्मक निर्णय घेतले गेले आहेत. हल्ल्यानंतर भारताची वक्तव्ये आक्रमक झाले असून, पाकिस्तानी लष्करानेही सरकारला परिस्थितीची माहिती दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देश दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेत पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि पहलगाममधील 26 जणांच्या हत्येची कोणतीही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यास ते तयार असल्याचे म्हटले.
भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या शाखेला जबाबदार धरले आहे आणि प्राथमिक तपासात दोन हल्लेखोर पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पाकिस्तानने आरोप फेटाळले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ‘निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशी’साठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानच्या प्रस्तावाची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.
शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करी तयारीवर भर देताना सांगितले की, “पाकिस्तानची सशस्त्र सेना देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पूर्ण सक्षम आहे.” त्यांनी २०१९ मधील बालाकोटमधील भारत-पाकिस्तान संघर्षाचा संदर्भ देत पाकिस्तानच्या “मोजक्या आणि ठाम प्रतिसादाची” आठवण करून दिली.
दरम्यान, ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने (TRF) हल्ल्यानंतर जबाबदारी स्वीकारल्याचे सुरुवातीला जाहीर केले होते, परंतु नंतर त्यांनी त्याचा इन्कार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ला झाल्यामुळे चुकीचा संदेश प्रसिद्ध झाला.”
या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर (LoC) सलग चौथ्या रात्री भारत आणि पाकिस्तान यांच्यात गोळीबाराची नोंद झाली आहे. भारतीय लष्कराने “२७-२८ एप्रिल दरम्यान पाकिस्तानकडून निष्कारण गोळीबार करण्यात आला,” असा आरोप केला आहे. मात्र दोन्ही बाजूंनी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Pakistan’s defense minister expressed fear of an attack
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती