Devendra Fadnavis : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम 22 एप्रिल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा जणांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्याचबरोबर पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबियांच्या शिक्षणाकडे तसेच रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार आहे. पुण्यातील संतोष जगदाळे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे.

जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देणार, असा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.

22 एप्रिल मंगवार दुपारी, पहलगामच्या बैसरन व्हॅलीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी नृशंस हल्ला केला. त्यांनी पर्यटकांना बेसावध गाठलं, त्यानंतर हिंदू कोण, मुस्लिम कोण असं विचारत वेगळं व्हायला सांगितंल, अजान म्हणायला सांगितली असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 25 भारतीय तर एक नेपाळी नागरिक होता. मृतांमध्ये देशाच्या विविध भागातील पर्यटकांचा समावेश असून महाराष्ट्रातील 6 जणांनी जीव गमावला.,

डोंबिवतील 3 मावसभावांचा मृत्यू झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे लहानपणापासूनचे मित्र, तेही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

Devendra Fadnavis announces Rs 50 lakh each to the families of those killed in Pahalgam attack

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023