विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवी मुंबईत ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. धक्कादायक म्हणजे दोन पोलीस कर्मचारी व कस्टम अधिकाऱ्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडवली आहे. चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता.या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले…अधिक चौकशी केली असता यामध्ये दोन पोलीस हवालदारांसह दहा जणांना अटक केली आहे.
थायलंडसह, परदेशातून या ड्रग्स प्रकरणातील माल मागवत असून मुंबईसह नवी मुंबईमध्ये आणल जात होता. त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवलं जात होत. तसेच या कारवाईमध्ये २ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे. ७३ लाख ९३ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. या संदर्भात नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन भालेराव याचा सतत गुरुनाथ चिचकर यांच्याशी संपर्क असल्याचे समोर आले. तपासाचा अंदाज लागताच भालेराव आपल्या मूळ गावी पळून गेला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गावातून पकडले आहे.
यामध्ये पोलीस हवालदार सचिन भालेराव सोबत पोलीस हवालदार संजय फुलकर यांना देखील अटक करण्यात आली आहे . कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना देखील अटक केली असल्याची माहिती पोलीस यांनी दिली.
International drug racket busted; Ten people including two police personnel and customs officer arrested
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती