विशेष प्रतिनिधी
मुंबई : काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. यावरून शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी काँग्रेस पक्षाला चांगलेच खडसावले आहे. पहलगाम दहशतवादी हल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करण्यापूर्वी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे अधिवेशन बोलावून ज्या काँग्रेस नेत्यांनी पहलगाम पीडितांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत भूमिका जाहीर करावी, अशा शब्दांत
मुंबईत बाेलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसने आधी स्वतःकडे पहावं. संसद अधिवेशनाची मागणी करण्याआधी काँग्रेसने तात्काळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ) अधिवेशन बोलवावे आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी. विजय वडेट्टीवार यांनी पीडितांच्या अनुभवांवर शंका घेतली, कर्नाटकातील काँग्रेस मंत्री आर. बी. थिम्मापूर आणि सिद्धरामय्या यांनी धर्म विचारुन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला नाकारलं, सैफुद्दीन सोज यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर विश्वास ठेवण्याचं सुचवलं. तारीक अन्वर यांनी पाकिस्तानसोबत संवादाची मागणी केली, ही केवळ वैयक्तिक मतं नाहीत, तर एक धोकादायक आणि देशविरोधी विचारसरणीचे लक्षण आहे.
काॅंग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी- वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा म्हणाले हाेते की “आतंकवाद्यांनी भारतातील मुस्लीमांवरील कथित अन्यायामुळे हल्ला केला” हे पूर्णपणे निंदनीय आणि निषेधार्ह आहे. काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्यं केवळ राजकीय अपरिपक्वता नाही तर पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.
हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांच्या विधवा पत्नी आणि अनाथांच्या वेदनांचा उपहास करण्यासारखे अमानवी कृत्य आहे. काँग्रेसने स्पष्ट सांगावं की ते दहशतवाद्यांच्या हल्ल्याने पिडीत झालेल्या निर्दोष नागरिकांच्या बाजूने आहे की आपल्या नेत्यांच्या ज्यांनी आतंकवाद्यांचं समर्थन केलं? असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. या राष्ट्रीय संकटात देशाला एक ठाम आणि एकत्रित भूमिका हवी आहे. दिशाभूल करणारी, तुष्टीकरणावर आधारित भूमिका नको, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
Will Congress take action against those who insult Pahalgam victims? Question by MP Dr. Shrikant Shinde
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती