Beed Vidhansabha : काका पुतण्यांच्या लढाईत मराठा आंदोलनाची धग

Beed Vidhansabha : काका पुतण्यांच्या लढाईत मराठा आंदोलनाची धग

गेल्या निवडणुकीत पुतण्याने काकांवर मात केल्याने चर्चेत आलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काका पुतण्याची लढाई रंगणार आहे. मात्र शिवसंग्राम पक्षाच्या डॉ. ज्योती मेटे यांनीही तयारी सुरू केल्याने मराठा आंदोलनाची धग या मतदारसंघात जाणवणार आहे. Beed Vidhansabha

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यांचे जनसंपर्क दौरे पाहता आता माघार नाही असा चंग त्यांनी बांधलेला दिसतो. शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांचीही याच मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. त्या निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे निश्‍चित मानले जाते. मात्र, हे दोन नेते कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण, पक्ष नसला तरी अपक्ष का होईना लढायचेच अशी या दोघांची मानसिकता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री असलेले जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. जयदत्त क्षीरसागर यांनी दोन वेळा जुन्या चौसाळा विधानसभा मतदारसंघातून तर दोन वेळा बीड मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2014 च्या मोदी लाटेत जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमेव जयदत्त क्षीरसागर आमदार होते. मात्र, बंडखोरी केलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी जवळ करत असल्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद॒धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले.

ठाकरे यांनीही त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये सहा महिन्यांसाठी मंत्रिपद दिले. पण, दीड वर्षांपूर्वी विकड कामांचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना निलंबित केले. तेव्हापासून ते कोणत्याच पक्षात नाहीत. वर्षभरापूर्वी त्यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर देखील त्यांना सोडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले आहेत.
मे महिन्यात झालेल्या लोकसभेला निवडणुकीत त्यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे होता. आता त्यांनीही विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून ते मैदानात उतरणार हे निश्‍चित नाही. शरद पवार विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना टाळून उमेदवारी देतील का हा प्रश्न आहे.

यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका-पुतण्या समोर येण्याची चिन्ह असताना क्षीरसागर कुटुंबातील आणखी एक सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर इच्छुक आहेत. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असल्यामुळे त्यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचाच आमदार असल्यामुळे अजित पवार गटही येथे उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी करू शकतो. अजित पवार गटाचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यानांही जिल्ह्यात अजित पवार गटाचे आमदार निवडून आणण्याचे आव्हान असेल.

दुसरीकडे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप कोणतीही हालचाल केलेली दिसून आलेली नाही. २०१९ साली शिवसेनेत प्रवेश केला असला तरी निष्क्रिय असल्यामुळे २०२२ साली त्यांना पक्षातून बाजूला करण्यात आले होते. तेव्हापासून ते राजकीय आणि सामाजिक पटलावर दिसलेले नाहीत. मात्र विधानसभेच्या तोंडावर ते भाजपा किंवा अजित पवार गटाकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात असे सांगितले जाते.


रतन टाटा गेल्यानंतर वारसा कोण सांभाळणार?, एन. चंद्रशेखरन यांच्यासह सावत्र भाऊ नोएल टाटांचे नाव पुढे


राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेचाही या मतदारसंघावर एकेकाळी वरचष्मा राहिलेला आहे. १९९०, १९९५ असे सलग दोनवेळा शिवसेनेचे सुरेश नवले हे याठिकाणी आमदार होते. तर त्यानंतर १९९९ ते २००४ या टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सय्यद सलीम सय्यद अली निवडून आले होते. त्यानंतर २००४ साली पुन्हा एकदा शिवसेनेचे सुनील धांडे निवडून आले होते. सुरेश नवले यांना १९९५ साली महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदही मिळाले होते. यंदा सुरेश नवले हेदेखील शिवसेनेच्या एका गटाकडून तिकीट मागण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी सुरेश नवले मित्र मंडळाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देऊ केला होता.

विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे तेली (ओबीसी) प्रतिनिधित्व करतात. मराठवाड्यात आरक्षण आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसत असताना बीड विधानसभेतही मराठी विरुद्ध ओबीसी संघर्ष दिसेल का? हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिसेल. मराठा आंदोलन जोरात सुरू असताना काही समाजकंटकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. तरीही त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात एकही टीकेचा सूर लावून धरला नाही. मराठा समाजाच्या आडून दुसऱ्याच कुणीतरी हा हल्ला केला असावा? असा दावा त्यांनी केला आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न केला.

बीड विधानसभा मदारसंघात बीड शहराचा समावेश होतो. या शहरावर गेल्या २५ वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबियांचे एकहाती नियंत्रण होते. नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदारकी अशी सर्व काही पदे घरातच असताना भावा-भावांमधील संघर्ष पेटल्यामुळे क्षीरसागर कुटुंबिय आता विखुरले आहेत. बीड एकाच घरात हे सर्वजण राहत असले तरी त्यांच्या राजकीय वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. जातीय गणिते, पक्षांतरे यामुळे विविध विधानसभा मतदारसंघातील गणिते नेहमी बदलत असतात. बीड विधानसभेत २००९ आणि २०१४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (संयुक्त) माजी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळविला होता. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीला सहा महिने उरले असताना क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळविले. पण २०१९ च्या विधानसभेत मात्र त्यांना विजय मिळविता आला नाही.

दिवंगत विनायकराव मेटे यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसंग्रामची कमान सांभाळणाऱ्या डॉ. मेटेंचे लक्ष्यही बीडवरच आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात सहकार सहनिबंधक पदाचा राजीनामाही दिला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेतही त्या होत्या. पुण्यात त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामने ‘तटस्थ’ भूमिका घेतली असली तरी शिवसंग्रामांच कल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या बाजूनेच होता. लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी पुन्हा विधानसभेची तयारी सुरु केली असली तरी आजघडीला त्यांचा पक्ष ना महायुतीत आहे ना आघाडीत. त्यामुळे डॉ. ज्योती मेटे देखील कोणत्या पक्षात जाणार आणि उमेदवारी मिळविणार, हा पेच कायमच आहे. सध्याही त्या मतदारसंघात गावनिहाय दौरे करत आहेत. निवडणुक लढविणारच हे ठाम सांगणाऱ्या डॉ. ज्योती मेटे कोणत्या चिन्हावर मैदानात असणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

मराठा आंदोलनाचा प्रचंड परिणाम या मतदारसंघावर होण्याची शक्यता आहे. जे बजरंग सोनवणे २०१९ साली लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासमोर पराभूत झाले होते, ते यंदा पंकजा मुंडे यांच्यासमोर विजयी झाले. तीन-तीन पक्ष एकत्र असूनही मुंडे यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे येत्या विधानसभेलाही जरांगे फॅक्टर दिसणार का? याचीही उत्सुकता आहे.

 

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023