२८८ पैकी ६० आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पद मागणे योग् नाही, प्रताप सरनाईक यांचा घरचा आहेर

विशेष प्रतिनिधी

अकाेला : २८८ पैकी ६० आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पद मागणे योग्य होणार नाही, असा घरचा आहेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना दिला आहे. Pratap Sarnaik

शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधाने केली जात आहेत. यावर या नेत्यांना सल्ला देताना सरनाईक म्हणाले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी एक कार्यकर्ता म्हणून आमची इच्छा आहेच. मात्र, शेवटी संख्याबळ महत्त्वाचे असते. २८८ पैकी ६० आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पद मागणे योग्य होणार नाही. आगामी काळात मोठे संख्याबळ निर्माण करावे लागेल. २०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.



आगामी निवडणुकांमध्ये युती होईल किंवा नाही, शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात मात्र पक्षाची भक्कम ताकद निर्माण करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.

अकोला मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत सरनाईक यांनी प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे.

प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने नियमित निरीक्षण करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले. बसस्थानकावरील स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी केली. यावेळी प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि जाणून घेतल्या. काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Demanding CM post with just 60 MLAs out of 288 is unjustified, says Pratap Sarnaik

महत्वाच्या बातम्या