पदासाठी विचारधारा बदलणार नाही, राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या चर्चांना नवनीत राणा यांचा पूर्णविराम

विशेष प्रतिनिधी

अमरावती : कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. Navneet Rana

सोशल मीडियावर पोस्ट करत नवनीत राणा यांनी राज्यसभा उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. आदरणीय सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पक्षांतराचा प्रश्नच उद्भवत नाही.



नवनीत राणा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी सुनेत्रा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची जागा भाजपसाठी सोडण्याची विनंती केली होती. मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. तरीही माझ्यावर विश्वास ठेवून राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल सुनेत्रा पवार, अजित पवार आणि पार्थ पवार यांची मी ऋणी असल्याचे त्यांनी म्हटले.

Navneet Rana rules out NCP switch, says she won’t compromise ideology for a post

महत्वाच्या बातम्या