Solapur Vidhansabha : चौरंगी लढतीत एमआयएमला कोण रोखणार हा मुद्दाच महत्वाचा

Solapur Vidhansabha : चौरंगी लढतीत एमआयएमला कोण रोखणार हा मुद्दाच महत्वाचा

 

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांची प्रत्येक वेळीनिवडणुकीत दमछाक करणाऱ्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसने बाबा मिस्त्री यांना उमेदवारी आहे. एमआयएमचीही मोठी ताकद असलेले हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होणार का? देवेंद्र फडणस आपल्या दोन निष्ठावान शिलेदारांपैकी कोणाच्या पारड्यात मत टाकणार? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांच्या काँग्रेसने केलेल्या फसवणुकीचा बदला घेणार का याची चर्चा आहे. Solapur Vidhansabha

सुमारे 25 टक्क्यांवरून अधिक मुस्लिम मतदार असल्याने एमआयएमची या मतदारसंघात ताकद आहे. गेल्या निवडणुकीत एमआयएमचे हाजी फारूक मकबूल शब्दी यांनी दुसऱ्या क्रमांकाची ३८७२१ मते घेतली होती. अपक्ष उमेदवार महेश कोठे तिसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे दिलीप माने चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या 25 टक्क्यांच्या वर म्हणजे 72 हजारापेक्षा जास्त आहेत. अनुसूचित जातीचे मतदार 18 टक्के म्हणजे 52 हजारांवर आहेत.

मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपवर मात करून खासदार झालेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना त्यांच्या हक्काच्या याच सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रात अवघ्या ७९६ मतांची निसटती आघाडी मिळाली होती. भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाच्या यशस्वी प्रयोग करून त्यांना रोखण्यात यश मिळविले होते. लोकसभा हरली, तरी इकडे सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवर मिळविलेल्या उल्लेखनीय मतांच्या बळावर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातूनच ही विधानसभेची जागा स्वत: लढविण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एकीकडे सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे सांगितले होते. ते या मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत.

मात्र लोकसभेला भाजपकडून लढलेले राम सातपुते आता या मतदार संघातून विधानसभेला इच्छुक झाले आहेत. माळशिरस मतदारसंघातून आपला टिकाऊ लागणार नाही या भीतीने ते येथे प्रयत्न करत आहेत. हिंदुत्ववादी मतांच्या ध्रुवीकरणावर निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या या दोन शिलेदारांपैकी कोणावर डाव लावतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २००९ पासून सलग तीन वेळा या मतदारसंघाने खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व फुलविले आहे. अलीकडे ‘एआयएमआयएम’ पक्षाने गेल्या दहा वर्षांत मुस्लीम मतपेढी मजबूत करून पाय रोवले आहेत.

त्यामुळे तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना महायुतीपेक्षा ‘एमआयएम’शीच कडवा मुकाबला करावा लागायचा. किंबहुना ‘एमआयएम’ने मागील २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा लढतीत काँग्रेसला अक्षरश: झुंजविले आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली असता सेनेची मर्यादित ताकत पाहता ‘एमआयएम’चा धोका ओळखून संघ परिवारासह हिंदुत्ववादी मतांचे माप काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात टाकले जात होते. अलीकडे मोदी झंझावातामध्येही हीच स्थिती दिसत होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील यशाने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील माकपचे नेते नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना मदत केली होती. त्यांनी ही जागा स्वत:साठी मागितली होती. मात्र काँग्रेसने बाबा मिस्त्री यांची उमेदवारी जाहीर केली. आडम मास्तर वेगळे लढणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. या चौरंगी लढतीत एमआयएम ला कोण रोखणार हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

Solapur Vidhansabha four candidate

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023