विशेष प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महा विकास आघाडी टेन्शन वाढवली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून हट्टाने दीपक साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केल्याने शेतकरी कामगार पक्ष नाराज झाला आहे. शरद पवार यांच्या सूचनेकडे ही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष करून शहाजी पाटील यांच्या विरोधात साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेनेचे उमेदवार पुढीलप्रमाणे : चाळीसगाव – उन्मेश पाटील, पाचोरा – वैशाली सुर्यवंशी, मेहकर (अजा) – सिध्दार्थ खरात, बाळापूर – नितीन देशमुख, अकोला पूर्व – गोपाल दातकर, वाशिम (अजा) – डॉ. सिध्दार्थ देवळे, बडनेरा – सुनील खराटे, रामटेक – विशाल बरबटे, वणी – संजय देरकर
लोहा – एकनाथ पवार, कळमनुरी – डॉ. संतोष टारफे
परभणी – डॉ. राहुल पाटील, गंगाखेड – विशाल कदम, सिल्लोड- सुरेश बनकर, कन्नड – उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी, संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे, वैजापूर – दिनेश परदेशी
नांदगांव – गणेश धात्रक, मालेगांव बाह्य – अद्वय हिरे
निफाड – अनिल कदम, नाशिक मध्य – वसंत गीते, नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर, पालघर (अज) – जयेंद्र दुबळा, बोईसर (अज) -डॉ. विश्वास वळवी
गेवराई – बदामराव पंडीत, धाराशिव – कैलास पाटील
परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील, बार्शी – दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील, सांगोले – दिपक आबा साळुंखे, पाटण – हर्षद कदम, दापोली – संजय कदम, गुहागर – भास्कर जाधव, रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने, राजापूर -;राजन साळवी
कुडाळ – वैभव नाईक, सावंतवाडी – राजन तेली, राधानगरी – के.पी. पाटील, शाहूवाडी – सत्यजीत आबा पाटील, भिवांदिन -महादेव घाटक,
अंबरनाथ (अजा) – राजेश वानखेडे, डोंबिवली -दिपेश म्हात्रे, कल्याण – सुभाष भोईर, कोपरी पाचपाखाडी
– राजन विचारे, ऐरोली – एम.के. मढवी, अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके, कलीना – संजय फतनीरा, वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई, माहिम – महेश सावंत, वरळी – आदित्य ठाकरे, कर्जत – नितीन सावंत
नेवासा – शंकरराव गडाख