Nura Kushti माहीममध्ये नुरा कुस्ती की शिंदेंचा शिलेदार राज ठाकरेंच्या लेकाला झुंजविणार

Nura Kushti माहीममध्ये नुरा कुस्ती की शिंदेंचा शिलेदार राज ठाकरेंच्या लेकाला झुंजविणार

Nura Kushti

विशेष प्रतिनिधी

गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्यातील सदस्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीची खूप चर्चा झाली. आता त्यांचा चुलत भाऊ आणि राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र याच मतदारसंघातून शिंदे गटाचे आक्रमक आमदार सदा सरवणकर लढत आहे. राज ठाकरेंच्या लेकाशी लढताना या शिलेदाराला शिंदे रसद पुरवणार की ही नुरा कुस्ती ठरून अमित ठाकरे सहज विजयी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नात्याचा मान राखून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार उभा केला नव्हता. मात्र या उपकाराची फेड केली नाही. एका बाजूला शिंदेंचा आमदार विरोधात असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने महेश सावंत या कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रीय आहेत.महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत कार्यरत होते. सावंत यांची ओळख माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक अशी होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.


Amit Thackeray : मनसेचे ठरले, अमित ठाकरे माहीम मधून लढणार, खडकवासल्यात मयुरेश वांजळे


2017 ला अपक्ष उमेदवारी

मुंबई महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेकडून सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी उमेदवारी न मिळाल्यानं महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत महेश सावंत यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरेंची साथ सोडली. याच काळात माहीम दादरची जबाबदारी महेश सावंत यांच्यावर देण्यात आली. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवीमध्ये राडा झाला होता. त्यावेळी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात संघर्ष झाला होता.

गेल्या काही महिन्यात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वेळा भेटी झाल्या होत्या. एकमेकांच्या घरीही ते गेले होते. एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना चागले मानतात. त्यामुळे सरवणकर लढणार का अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. मात्र सरवणकर यांनी माझ्यावर कोणताही दबाव नाही, त्यामुळे आता माघार घेणार नाही आणि निवडणुकीमध्ये मीच बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार राहिलेलो आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येक घरात, चाळीत आणि इमारतीत जनसंपर्क आहे. त्यामुळे लोक मला या लढाईत निश्चित विजयी करतील,” असा दावा सदा सरवणकर यांनी केला.

१९९० पासून माहीम मतदारसंघामध्ये शिवसेनेने विजय मिळवला आहे. सुरेश गंभीर १९९० पासून २००४ पर्यंत सलग चार टर्म या मतदारसंघातून विजयी झाले होते. तर २००९ साली मनसेचे नितीन सरदेसाई यांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर २०१४ आणि २०१९ साली परत सदा सरवणकर यांनी ही जागा शिवसेनेला मिळवून दिली. यंदा या जागेवर कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nura Kushti or Shinde’s Champion Set to Wrestle Raj Thackeray’s Son in Mahim’s

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023