Vijay Wadettiwar : अजितदादा + शिंदेंकडे बार्गेनिंग पॉवरच उरली नाही; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी हवा काढली!!

Vijay Wadettiwar : अजितदादा + शिंदेंकडे बार्गेनिंग पॉवरच उरली नाही; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी हवा काढली!!

Vijay Wadettiwar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकार मध्ये ज्यादा मंत्री पदे किंवा चांगली खाती अजित पवार किंवा एकनाथ शिंदे मागूच शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढी बार्गेनिंग पॉवरच उरलेली नाही, अशा परखड शब्दांमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय हवा काढून टाकली. Vijay Wadettiwar

महाराष्ट्रात भाजप आता एवढा मजबूत झाला आहे की एकनाथ शिंदे किंवा अजित पवार त्या पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणून आपल्याला हवी ती खातीपदरात पाडून घेतील आणि आपले हवे तेवढे मंत्री करतील, अशी स्थिती उरलेली नाही. त्यामुळे भाजप करेल तेवढेच मंत्री आणि देईल तेवढीच खाती घेऊन त्यांना समाधान मानावे लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी

विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातले राजकीय वस्तुस्थिती समोर आणली. महाराष्ट्रात भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. पक्षाला बहुमताचा 145 आकडा काढण्यासाठी फक्त 14 आमदारांची गरज आहे एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार आणि अजित पवार यांचे 41 आमदार यांनी कुठला राजकीय हट्ट करून जरी भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तरी अपक्ष आमदारांच्या साहाय्याने फडणवीस सरकार मजबुतीनेच राज्य करू शकेल, अशी स्थिती आज महाराष्ट्रात उद्भवली आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही राजकीय पक्षांची भाजपबरोबर बार्गेनिंग करण्याची शक्ती क्षीण झाली आहे. तीच वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्यातून समोर आणली.

Congress leader Vijay Wadettiwar cleared the air

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023