Dhananjay Munde राजीनाम्यावर धनंजय मुंडे यांनी दिले एका वाक्यात उत्तर

Dhananjay Munde राजीनाम्यावर धनंजय मुंडे यांनी दिले एका वाक्यात उत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. मी आज कॅबिनेटच्या बैठकीसाठी आलो आहे, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या चर्चेवर उत्तर दिले.

राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना एका वाक्यात उत्तर दिले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात आधी तीन आरोपींना आणि नंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली. तर या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिला पाहिजे असंही विरोधक म्हणत आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती. दरम्यान वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. त्यावरुनही बरेच आरोप प्रत्यारोप झाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.



भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा सातत्याने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा मुद्दा लावून धरला आहे. तसंच सर्वपक्षीय नेत्यांनी याच प्रकरणात राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचं विष्णू चाटेचं कनेक्शन काय? तसंच पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे लोकसभेला कशा हरल्या हे देखील सांगितलं आहे

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येची तीन यंत्रणांकडून स्वतंत्रपणे या हत्येची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत कोणाचीच नावे पुढे आलेली नाहीत. जोपर्यंत कोणावर ठपका ठेवला जात नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एका अर्थाने त्यांनी धनंजय मुंडे यांना अभयच दिले आहे.

संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती.अजित पवार परदेश फोर्यवरून परतल्यावर कालच धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची तासभर चर्चा झालो. या चर्चेनंतर अजित पवार यांनी चौकशीत अद्याप कोणाचेच नाव पुढे नसल्याचे सांगत मुंडे यांना अभय दिले.

मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी भेट घेतली. मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असतानाच सोमवारी सायंकाळी मुंडे यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. सुमारे तासभर उभयतांमध्ये खलबते झाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येची विशेष चौकशी पथक, बीड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय न्यायालयीन चौकशीची घोषणा झाली आहे. जेव्हा-केव्हा चौकशीत नावे समोर येतील तेव्हा कारवाई करू, असे सांगत अजित पवारांनी मुंडे यांना एका अर्थी अभय दिले.

Dhananjay Munde’s one-sentence answer on resignation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023