विशेष प्रतिनिधी
बीड : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मनोज जरांगे पाटील यांनी एका मोर्चामध्ये बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्त्यव केलं होते. घरात घुसून मारू, बीड जिल्ह्यात फिरु देणार नाही अशी भाषा वापरली होती. यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर पहिला गुन्हा हा बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तालूर जिल्ह्यातल्या किनगाव पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे.
या तक्रारीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. विशिष्ट समाज आणि मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे, स्थानिक नेते किशोर मुंडे यांनी याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. या प्रत्येक मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत त्यांनी अनेकदा प्रशासन व्यवस्था आणि सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र मुंडे यांच्यावर बोलताना त्यांची भाषा घसरली होती
Second offense against Manoj Jarange for using offensive language while criticizing Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली