विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज ठाकरेंच्या मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात. मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची आहे असा आरोप करत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावं जाहीर करावीत. आज त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीत राक्षस बसले आहेत. ईडी, सीबीआय त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ही फोडाफोडी सुरु आहे. भाजपाला किती आमदार, किती खासदार पाहिजेत त्यांचं भवितव्य काय? त्यांच्या तोंडावर हाडकं पडणार आहेत चघळायला. यात महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान याचा काही संबंध येत नाही.
शरद पवारांच्या आमदारांना, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही यात देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मुखवटे गळून पडत आहेत. तुमच्याही तिरड्या राजकारणातून उचलल्या जाणार आहेत कधीतरी हे विसरु नका. तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासात तुमची नोंद लोकशाहीचे वाट लावणारे लोक अशी होणार आहे.
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेलं आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरु आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा तुम्ही जिंकला आहात तरीही तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडाफोडी सुरु आहे. देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
राऊत म्हणाले, सगळं जग हे सांगतं आहे की ईव्हीएम घोटाळा आहे. जर निवडणूक आयोग हे म्हणत असेल की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर निवडणूक आयोगात घोटाळा आहे. सगळ्या जगाने ईव्हीएम नाकारलं आहे आणि हे शहाणे आले आहेत का? राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना बक्षीस देतील.
Using Raj Thackeray MNS against Shiv Sena, Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली