विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कलगीतुरा महाराष्ट्राने बघितलं होता. आता पुन्हा एकदा संजय राऊत हाच खेळ करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत अक्षरशः तमाशा केला. यामुळे महविकास आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना दिल्ली विधानसभेच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले,
जरी पृथ्वीराज चव्हाण म्हणत असतील आप आणि काँग्रेस दिल्लीतल्या विधानसभा एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल लागला असता पणतेथील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाही. जे दिल्ली विधानसभेत घडलं ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये देखील घडू शकतं. लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं
लोकसभेत, राज्यसभेत आम्ही इंडिया अलाईस म्हणून काम करत असतो. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना काँग्रेस बरोबर निवडणुका लढाव्या लागतील
या जर तर च्या गोष्टी आहेत. भाजप आणि त्यांचा एनडीए यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी सर्वपक्षीयांची एकजूट आवश्यक आहे. नाहीतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष आहे भस्मासुर तो सर्वांना खाऊन टाकेल, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली.
Sanjay Raut has indicated that the Thackeray group is preparing for independence in the Mumbai Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली