विशेष प्रतिनिधी
परभणी : बीडच्या प्रकरणामध्ये राजकारण आणले कुणी, मोर्चाची सुरुवात केली कुणी ? असा सवाल करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, परभणीच्या प्रकरणामध्ये देशातील मोठे नेते येऊन गेले. मात्र शासनाचे अधिकृत प्रतिनिधी आले नाहीत. ज्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले जात आहेत त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.संबंधित अधिकाऱ्याची कारकीर्द वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही त्यांच्या कुटुंबियाची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे.
सोमनाथ सूर्यवंशच्या जाण्याने कुटुंबाचे नाही तर समाजाचे नुकसान झाले आहे. शासनाने नोकरी दिलीच पाहिजे, परंतु आरोपीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशातील एवढे मोठे नेते येऊन गेल्यानंतर देखील शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. परभणीचे प्रकरण असो की बीडचा प्रकरण असो यातील आरोपी बाहेर सुटले नाही पाहिजे
अंजली दमानिया फोटो यांनी बीड प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड यांच्यासोबत हाके यांचा फोटो ट्विट केला आहे. यावर ते म्हणाले, अंजली दमानिया यांनी माझा फोटो ट्विट केला आहे. माझ्या बरोबरच शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, अनेक आमदार, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांचे देखील वाल्मिक कराडसोबत फोटो आहेत. त्यामुळे या सगळ्यांसाठी एक जेल बनवायला सांगा आणि ज्यांचे ज्यांच्या सोबत फोटो आहेत त्यांना त्या जेलमध्ये टाका . त्यानंतर मला यांचा सहवास लाभेल आणि महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत ते समजतील.
अंजली दमानिया धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागून सनसनाटी निर्माण करत आहेत, अंजली दमानिया यांनी जेवढी जेवढी प्रकरणी काढली त्याच्यापुढे काय झाले आहे हे सर्वांनाच माहित आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे काही चौकशी सुरू आहे त्याच्यावर प्रभाव टाकणे एवढाच उद्देश अंजली दमानिया यांचा आहे, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.
Who brought politics in the case of Beed, who started the march? Laxman Hake’s question to Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली