विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यात वाद असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र असा वाद नाही म्हणत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वादाची कबुलीच दिली.
पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले, जयंत पाटील ज्येष्ठ आहेत. रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई नाही. जयंत पाटील यांना बाजूला काढा अशी कार्यकर्त्यांची मागणी नाही. यश-अपयशावर प्रदेशाध्यक्ष ठरत नाही. लोकसभेचे यश हे जयंत पाटील यांचे यश आहे. कार्यकर्त्यांनी मतं मांडावीत पण अंतिम निर्णय शरद पवार घेतात. जयंत पाटील ज्येष्ठ आहेत. रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई नाही.
बीड प्रकरणावर ते म्हणाले, आम्ही कुठे म्हणतो की धनंजय मुंडेंनी खून केला. पण नैतिकता नावाची गोष्ट असते. खून करणारा माणूस मुंडेंच्या जवळचा होता हे तेच सांगतात. महाराष्ट्राचा इतिहास बघा किती जणांनी राजीनामा दिले होते. स्वत: अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता तेव्हा ते दोषी होते का? तुरुंगात गेले होते का? मग का दिला होता राजीनामा?
धनंजय मुंडेंचा या खूनात सहभाग आहे असं माझं मत नाही. वाल्मिक कराडच्या जवळच्या पोलिसांना बाहेर काढले. कारण त्यांचा चौकशीवर प्रभाव पडू शकतो. मग धनंजय मुंडेंचा प्रभाव पडणार नाही का?
Saying no, Jitendra Awhad confessed to Rohit Pawar vs Jayant Patil dispute
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली