Jarange Patil : संतोष देशमुख प्रकरणात दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांशी जरांगे पाटील यांचा इशारा

Jarange Patil : संतोष देशमुख प्रकरणात दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांशी जरांगे पाटील यांचा इशारा

Jarange Patil

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर:Jarange Patil  संतोष देशमुख प्रकरणात दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांशी आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.Jarange Patil

पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एकच सांगणे आहे की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. सगळ्या आरोपींना फाशी दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेवटचा आरोपी जो फरार आहे तो देखील सापडेल



मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की सर्वांवर कठोर कारवाई होणार तोपर्यंत मराठे शांत आहेत जर दगाफटका झाला तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरु होणार आहेत . संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत हटणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. या प्रत्येक मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करत त्यांनी अनेकदा प्रशासन व्यवस्था आणि सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

Jarange Patil warns that the government will clash with the Marathas if there is a scandal in the Santosh Deshmukh case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023