पुणे : पुण्यातील पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक झाले असून, पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
पुण्यातील पर्वती टेकडीवर बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे संग्रहालयाचा विकास व्हावा; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील आग्रही असून, जिल्हा नियोजन, आमदार निधी आणि लोकसहभागातून विकास करण्यात येत आहे. यामध्ये पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह; भारताचा उज्वल इतिहास आणि पेशवे कालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात येत आहेत.
या सर्व कामाची पाहणी आज नामदार पाटील यांनी करून आढावा घेतला. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, देवदेवेश्वर संस्थाचे रमेश भागवत, शिल्पकार विवेक खटावकर आदी उपस्थित होते.
या पाहाणी नंतर माध्यमांशी संवाद साधताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आठ महिन्यांपूर्वी पर्वती टेकडीच्या विकासाचा विषय समोर आला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी सादरीकरण देखील झाले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन आणि स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या आमदार निधीतून भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. यातील काही कामे शासनाच्या नियमात बसत नसल्याने सीएसआर निधीतून ती पूर्ण करण्यात आली. ही सर्व कामे अतिशय उत्तम दर्जाची झाली आहेत.
ते पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील कामाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे, असा प्रयत्न आहे. तसेच, पुढील टप्प्यांचे देखील काम लवकरच सुरु करणार असून; कामांची यादी तयार करुन सादर करण्याच्या सूचना देवदेवेश्वर संस्थान आणि स्मारक विकास समितीला केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Bajirao Peshwa Memorial The first phase will be inaugurated by Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली