विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जाहीरनामा पाच वर्षांसाठी आहे, आर्थिक परिस्थिती पाहून शासन कर्जमाफी करणार आहे, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. Hasan Mushrif
आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते. यावरून गदारोळ झाल्यावर मुश्रीफ म्हणाले, बंटी पाटलांनी कळ काढली म्हणून मी बोललो. आता ज्या योजना आहेत ते सुरू राहण्यासाठी काही विकास कामांना कात्री लावावी लागेल. काही वेळा कर्ज घ्यावे लागेल आणि आमच्या मागे केंद्राचे डबल इंजिन सरकार आहे याचा फार मोठा फायदा आम्हाला होणार आहे. Hasan Mushrif
शरद पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील यांना हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील यांच्या बद्दल बोललेलं ऐकून माझ्या मनाला यातना झाल्या माझा कोणाशीही काहीही संवाद झालेला नाही.
समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, ते पुन्हा भाजपमध्ये जातील असं वाटत नाही. कारण आम्ही 35 वर्ष शरद पवार यांच्यासोबत होतो बाहेर पडताना आम्ही आमच्या अडचणी सांगून बाहेर पडलो. माझ्या विरोधात शरद पवार यांनी त्यांना तयार केले जसं माझ्यावर प्रेम केलं. तसं संपूर्ण पवार परिवाराने त्यांच्यावर प्रेम केलं. सुप्रिया सुळे यांनी माझ्या मतदार संघात कधी आल्या नाहीत पण त्या २५ वर्षात त्यांच्या प्रचाराला आल्या. ते पुन्हा शरद पवार यांना धक्का देऊन जातील असे मला वाटत नाही.
Farmers Loan Waiver will be om the financial situation, explained by Hasan Mushrif
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली