विशेष प्रतिनिधी
मुंबई : महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा करत असताना शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो असा सवाल करत काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते अशी टीका त्यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी काँग्रेसला थेट सवाल केले. ते म्हणाले, हरयाणात आम्ही होतो का? काँग्रेससोबत कोणी नव्हतं. हरयाणात का हरला? जम्मू काश्मीरला का हरलात, . आम्ही नव्हतो. पश्चिम बंगालला शिवसेना होती का ? अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो. सर्वत्र आम्ही आहोत का? संजय राऊत आहे का? वडेट्टीवार त्या बैठकांना होते. आघाडीत समन्वय आणि तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. जे भूमिका स्वीकारत नाही त्यांना आघाडीत राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते.
आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला अजमवायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले. आमचं ठरतंय की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीत लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसत असतो. स्वबळावर लढून पक्ष मजबूत करायचा आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली होती, पण प्रत्येकजण आपलंच घोडं दामटवत राहिला. आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती. तो सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पण त्यांना ते जमलेलं नाही.कोणाला तरी राज्यात सर्वाधिक जागा लढवून मुख्यमंत्रीपद हवं होतं, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केलं आहे.
Some people were sewing the Chief Minister’s coat, Sanjay Raut’s strong attack on Congress
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली