ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट

ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता सगळ्याच पक्षांनी एकमेकांवर खापर फोडायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत दिले आहेत.
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

तसेच महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिले होते. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. “मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत”, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.

मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत असं विधान केलं होतं. त्या संदर्भात संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “त्यांचं खरं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती राहिलेली आहे आणि ती संस्कृती आम्ही देखील पाळलेली आहे. शेवटी राज्याचा विकास आणि जनतेचा विकास महत्वाचा असतो. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पाहिजे. मात्र, दुर्देवाने भारतीय जनता पक्षाने शत्रुत्व ठेऊन राजकारण करण्याची परंपरा सुरु केली”, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

Indications of Thackeray fraction contesting elections on their own, split in Mahavikas Aghadi is clear

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023