विशेष प्रतिनिधी
मुंबई : एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता, असा पलटवार खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे.
शिर्डी भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली”, असं अमित शाह म्हणाले होते.
सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणी प्रकरणांचा संदर्भ देत अमित शहा यांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता.
बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही, आणणार नाही. सुरेश धस यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की ही बीडची बदनामी नाही. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. वाल्मिक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. राज्यातल्या माध्यमांनी हे प्रकरण ३१ दिवस लावून धरलं आहे.
कारण माध्यमांनी नैतिक जबाबदारी म्हणून हे सगळं समोर आणलं. आम्ही वाल्मिक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय, अत्याचार असं सगळं होत असताना गप्प बसायचं का? ” असा सवालही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला.
Somnath Suryavanshi and Santosh Deshmukh families.. Supriya Sule’s attack on Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
- Suresh Khade मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलोय, हिंदू गर्जना सभेत आमदार सुरेश खाडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
- Hasan Mushrif शेतकरी कर्जमाफी आर्थिक परिस्थिती पाहून, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
- Ajit Pawar शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत अर्थमंत्री अजित पवार चक्क नाही होऊन पडले?