विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांची गरज संपली. शिंदेंना संपवून उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदी आणण्यात येईल असे शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या असे म्हणत दोघांना फटकारले आहे.
मंत्री गिरीष महाजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे गावी गेले आहेत. यावरून काँग्रेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतील नाराजीवर टोला लगावला आहे. शिंदेंना संपवून उद्या उदय सामंत यांना पुढे आणले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. उदय सामंत का? कारण उदय दोन्ही डगरीवर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे.
पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी नाट्य सुरु झाले आहे. यावर पवार म्हणाले, पालकमंत्री पदाबाबतचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. कुणाला पालकमंत्री पद द्यावे, कोणाच्या पालक मंत्रीपदाला स्थगिती द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आज मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, तिथून आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतील. ज्यांना पालकमंत्री पद जाहीर केलं होतं तेच २६ जानेवारीला झेंडावंदन करणार आहेत
सैफ अली खान हल्ला प्रकरणावर सैफवर हल्ला झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था ढासाळल्याची टीका झाली, असे पवार म्हणाले बांगलादेशी आरोपीवर ते म्हणाले, आपल्या देशात भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे. बाहेरच्यांना राहण्याचा अधिकार नाही. आपल्या संविधानात, कायद्यात, नियमांमध्ये स्पष्टता दिली आहे त्या पद्धतीने सर्वांनी वागलं पाहिजे.
Factless news, Ajit Pawar slammed
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती