विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rahul Shewale बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी 23 जानेवारीला मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी लगावला आहे . Rahul Shewale
राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे असा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे म्हणाले, 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, आणि त्यामुळे कुठे न कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा..
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळं होणार होते. त्यांच्यासोबत वीस आमदार होते. राज्यात महायुतीचं सरकार आलं, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच आता त्यानंतर राहुल शेवाळे यांनी देखील राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.
Worry about the decline of your own party rather than the Uday of another party, says Rahul Shewale
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार