वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : Donald Trump अमेरिकेत पुन्हा एकदा ‘ट्रम्प युग’ परतले आहे. रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता अमेरिकन संसद कॅपिटल हिल येथे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शपथ दिली. यासह ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
शपथविधी सोहळ्यादरम्यान, पत्नी मेलानिया बायबल धरून उभ्या होत्या. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर, कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडामध्ये काही काळ टाळ्यांचा कडकडाट झाला. यापूर्वी, त्यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या आधी रिपब्लिकन नेते जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेचे 50 वे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात 8 घोषणा केल्या
- अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी सैन्य तैनात केले जाईल.
- रिमेन इन मेक्सिको पॉलिसीच्या अंमलबजावणीची घोषणा.
- पकडा आणि सोडा (Catch and Release) पद्धत संपली आहे.
- परदेशी दहशतवादी संघटनांना गुन्हेगारी गट घोषित केले जाईल.
- अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना संपवण्यासाठी 1978 चा एलियन एनेमीज अॅक्ट लागू करण्यात आला.
- अमेरिकेत थर्ड जेंडर संपले आहे. फक्त दोनच लिंग असतील, पुरुष आणि महिला.
- मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात असे केले जाईल.
- पनामा कालवा पनामा कडून परत घेतला जाईल.
मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
ट्रम्प म्हणाले- आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू
ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे.” या दिवसापासून, आपला देश पुन्हा समृद्ध होईल आणि जगभरात त्याचा आदर केला जाईल. मी अगदी सोप्या भाषेत सांगेन की, अमेरिकेला प्रथम स्थान देईन. आपले सार्वभौमत्व परत मिळवले जाईल. आमची सुरक्षा पुनर्संचयित केली जाईल. न्यायाचे तराजू पुन्हा समतोल केले जातील. न्याय विभाग आणि आपल्या सरकारचे क्रूर, हिंसक आणि अन्याय्य शस्त्रास्त्रीकरण संपेल. आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू.
40 वर्षांनी संसदेत पार पडला शपथविधी
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये तापमान उणे 5 अंश सेल्सिअस आहे. कडाक्याच्या थंडीमुळे, राष्ट्रपतींचा शपथविधी समारंभ 40 वर्षांनी संसदेत पार पडला. यापूर्वी 1985 मध्ये, रोनाल्ड रेगन यांनी कॅपिटल हिलमध्ये शपथ घेतली होती. सामान्यतः राष्ट्राध्यक्ष नॅशनल मॉलमधील खुल्या मैदानात शपथ घेतात.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. रशिया-युक्रेन आणि अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
Trump becomes 47th President of the United States
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
- Dhananjay Munde धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आवाहन
- Saif Ali Khan सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड
- Ashwini Vaishnav भारतातील डिजिटल क्रांतीचा दावोस येथे जयघोष