एसटी नफ्यात आली मग 15 टक्के भाडेवाढ का? प्रकाश आंबेडकर यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

एसटी नफ्यात आली मग 15 टक्के भाडेवाढ का? प्रकाश आंबेडकर यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सूट दिल्याने दिवसाला 150 कोटींच्या तोट्यात असलेली एसटी महिन्याला 40 कोटी नफ्यात आली होती असे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मग देवेंद्र फडणवीस यांनी 15 टक्के भाडेवाढ का केली असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. Prakash Ambedkar

एसटी भाडेवाढीवर टीका करताना आंबेडकर म्हणालेएकनाथ शिंदे मला सर्जरीनंतर बघायला आले होते. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं की एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सूट दिली आहे त्यामुळे एसटी किती तोट्यात गेली आहे? त्यांनी उत्तर दिलं की या बरेचसे उलटं झाल आहे. 50 टक्के सूट दिल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाला एसटी 150 कोटींच्या लॉसमध्ये असलेली महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडे दरात 15 टक्क्यांनी वाढ केली. नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा ? असा सवाल त्यांनी केला. Prakash Ambedkar

आकडेवारीनुसार बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खरी होती. एसटी म्हणजे सर्वसामान्य लोकांचं साधन आहे. यात मुख्यमंत्र्यांनी 15 टक्क्यांनी दरवाढ केली त्याचा खुलासा करावा. आता फॅशन झाली जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो. भाडेवाढ का केली हे मुख्यमंत्री सांगायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे.भाडेवाढ मुळे सर्वसामान्य लोकांना भुर्दंड मात्र बसतो आहे, असा आरोप त्यांनी केला.

आंबेडकर म्हणाले, मी सर्वसामान्यांना सांगणार तुम्ही बीजेपीला निवडून दिलं. तेही पूर्ण बहुमताने. त्यामुळे आता आपण पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार रहा अशी परिस्थिती सर्वसामान्यांवर येणार आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीत कोठडीत मृत्यूमुखी पडले सूर्यवंशी हत्या प्रकरणात मागण्या मान्य केल्यानंतर त्याला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे. प्रकरण घडलं त्यावेळी काही करायचं नाही, सर्व झाल्यानंतर मोर्चे काढायचे का असा सवाल करून देशमुख आणि सूर्यवंशी यांची केस वेगळी आहे. शासनाने नेहमीप्रमाणे शासकीय चूक असताना भरपाई संदर्भात जो मार्ग अवलंबला आहे तो मार्ग चुकीचा आहे. हे प्रकरण ह्युमन राईट कमिशनकडे घेऊन गेलो आहोत.आम्हाला अपेक्षा आहे की ह्युमान राईट कमिशन त्याला न्याय देईल .

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर हल्लाबोल करताना आंबेडकर म्हणाले शेतकरी जसा दोषी आहे तसं जरांगे पाटील तुम्ही देखील दोषी आहात.जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवलं आहे.देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केले नाही. जी बीजेपी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हती तिलाच तुम्ही सत्तेवर बसवलं आहे

शेतकरी कर्जमाफीवर ते म्हणाले, शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे. मागील सरकारने देखील कर्जमाफी करतो, सात बारा कोरा करतो असं म्हटलं होतं शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो की त्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला बसवलं? ज्यांना सत्तेवर बसवलं त्यामुळे आता तुम्ही कशाला रडत आहेत? जे आपण पेरतो तेच उगवते. माफी करणारं सरकार नाही, सत्तेवर आल्यानंतर माफी करणार नाही असं म्हणत असेल तर यात नवीन काही नाही. निसर्गाच्या नियमाविरोधात वागणार असाल तर ते भोगाव लागतं. शेतकऱ्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे

Prakash Ambedkar’s question to Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023