विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Nirmala Sitharaman कर्करोग व अशा इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण ३६ जीवनावश्यक औषधांना मूलभूत कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट दिली जाणार आहे. याशिवाय इतर ६ जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देऊन ते ६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे औषधे स्वस्त होणार आहेत. Nirmala Sitharaman
टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहे. मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोनच्या बॅटरी स्वस्त होणार आहेत. टीव्हीचे देशांतर्गत उत्पादित होणारे पार्ट्स स्वस्त होणार
नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणं हे नव्या विधेयकाचं उद्दिष्ट असून टीडीएसमध्ये सुलभता आणणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली आहे. आयकर भरण्याची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवली. 4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरू शकता, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
Cancer drugs, TVs, mobiles and electric cars will become cheaper
महत्वाच्या बातम्या