विशेष प्रतिनिधी
पुणे : Rupali Chakankar महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रीारीनुसार कारवाई करत पोलनिसांनी आता दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Rupali Chakankar
याप्रकरणी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले . तर अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपींना आज गिरगाव येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील “राजकारण महाराष्ट्राचे” या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतरच पोलिसांनी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अखेर अविनाश कुळे आणि आकाश डाळवे यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
The two who posted obscenities against Rupali Chakankar have been arrested
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 22फेब्रुवारी पासून आंदोलन
- Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा
- Shashi Tharoor शशी थरूर बनले पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे चाहते, ‘या’ मुद्द्यावर झाले सहमत
- Chief Minister Delhi दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळेल का? भाजपच्या संभाव्य उमेदवार कोण आहेत जाणून घ्या