Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका

Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका

Nilesh Rane

विशेष प्रतिनिधी

कणकवली: Nilesh Rane उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही.येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात नाही तर महाराष्ट्रातही दिसणार नाही, अशी टीका शिवसेनेचे ( शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी केली.Nilesh Rane

शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांचीही शिंदे गटात येण्याची चर्चा सुरू आहे. यावर निलेश राणे म्हणाले, राजन साळवी शिंदे गटात येत असतील तर स्वागत. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मला माहिती नाही. मात्र यातून उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.उद्धव ठाकरेंना आपला किल्ला ढासाळताना दिसतोय ना तो किल्ला कधीच नव्हता. तो किल्ला वेगवेगळ्या उद्देशाने बांधला गेला होता.आपल्या विटा जो तो घेऊन चालला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या विटा नव्हत्या. ज्या विटा राहिल्या असतील त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राहिल्या.



मुसलमानांनी शिस्तीत राहायचं असा इशारा देताना ते म्हणाले, एक टपरी पडली, पाच टपोरी आतमध्ये आहेत. सुरुवात तुम्ही केलीत तर शेवट आम्ही करू शकतो, हे दाखवण्यासाठी आजचा कार्यक्रम होता.

त्यांना राहायचं असेल तर शिस्तीत राहायचं.

राणे म्हणाले, काही दिवसापूर्वी एका पर्यटकाला हातपाय बांधून विकृत पद्धतीने मारहाण झाली. तो पर्यटक कसाबसा वाचला. मी हिंदूंनी एकत्रित यावं असं आव्हानं केलं होतं.तोपर्यंत ती टपरी हटवली. हिंदूंची एकजूट दाखवायची होती, ती दाखवली, त्यानंतर महाआरती केली. म्हणजे आमची लढाई संपलेली नाही

विनायक राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हटले, राऊत यांचा वेळ जात नाही.त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्याकडे रिकामटेकडा भरपूर वेळ आहे. ते आपापल्या नवीन स्टोऱ्या बनवतात. त्यांनी आता स्टोरी रायटर म्हणून कुठेतरी काम बघाव

Nilesh Rane criticizes Uddhav Thackeray, Not capable to run party

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023