विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात “नोकरी द्या, नशा नाही!” या घोषवाक्यासह आंदोलन छेडण्यात आले. बेरोजगारी व तरुणाईच्या वाढत्या समस्या यावर केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. आंदोलनाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. Rasta Roko
युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काँग्रेस भवन येथून निघाला आणि डेक्कन परिसराच्या दिशेने पुढे जाऊ लागला, मात्र बालगंधर्व चौकात पोलीस प्रशासनाने मोर्चाला अडवले आणि मोठ्या संख्येने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या अडवणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आणि त्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब म्हणाले, “देशातील तरुणांना नशेच्या विळख्यात ढकलून बेरोजगार ठेवण्याचे हे सरकारचे षडयंत्र आहे. आम्ही याला कडाडून विरोध करू. सरकारने जर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून अधिक तीव्र लढा उभारेल. हे सरकार केवळ जाहिराती आणि घोषणा करत आहे, प्रत्यक्षात युवकांसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. आम्ही मागे हटणार नाही, युवकांचा हक्क मिळवूनच राहू!
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही. पुण्यातून निघालेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात तीव्र होईल.
युवकांना रोजगार न देता सरकार त्यांना व्यसनाच्या दलदलीत लोटत आहे. आम्ही हे चालू देणार नाही. ‘नोकरी द्या, नशा नाही’ हा लढा अधिक तीव्र करू!
यावेळी प्रदेश प्रभारी अजय चीकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, एहसान खान, रोहित कुमार, मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, सौरभ आमराळे, उमेश पवार, कौस्तुभ नवले,
अजित सिंग, वैष्णवी किराड, दीपाली ससाणे,
प्रथमेष आबनावे,प्रविण बिरादार, श्रीनिवास नालमवार, तारीक बागवान, गणेश उबाळे, आदी उपस्थित होते.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला, तरीही युवक काँग्रेसचा लढा अधिक तीव्र होत जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
Rasta Roko protest of Youth Congress in Pune, activists detained by police.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत