विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाबाबत पूर्वी नेहमीच चर्चा व्हायची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते काँग्रेसपासून दूर झाल्यांनतर ही शक्यता अगदीच धूसर झाली होती. पण काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांच्याकडे संधी चालून आली होती पण ती कशी हुकली याचा किस्सा शरद पवार यांनीच सांगितला.
पत्रकार निलेशकुमार कुलकर्णी यांच्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमात त्यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले. 1991मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. तेव्हा सर्व चित्र बदलले. सगळ्यांनी बसवून ठरवले की, काही ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीला उभे राहायचे. त्यात मीही होतो. पण माझी काहीच तयारी नव्हती. ती बैठक दिल्लीतच झाली होती.
त्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाला, पक्षाचे नेतृत्व करायला दोन-तीन लोकांची नावे शॉर्टलिस्ट झाली होती. त्याच्यात माझे नावही होते. पण शेवटी निर्णय नरसिंह राव यांच्या बाजूने लागला. मला 158 मते मिळाली आणि नरसिंह राव यांना बहुदा 190 आणि काही अधिक मते मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले. नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात माझा समावेश करून संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मी स्वतः अनेक वर्ष संसदेत आहे. 1984 साली मी पहिल्यांदा लोकसभेत आलो. तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हतो तर, विरोधी पक्षात होतो. इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर निवडणुकीला विरोधकांमधले अनेक लोक उभे राहिला तयार नव्हते. एक वेगळे वातावरण होते. तरीही, विरोधी पक्षाचेही काम केले पाहिजे आणि म्हणून आम्ही काही लोकांनी निवडणूक लढवायचे ठरवले. मी निवडणुकीला उभा राहिलो आणि निवडून आलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधी ते आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्याशी आम्हा लोकांचा सुसंवाद होता. राजकारणामध्ये अनेक प्रश्नांवर मतभेद असतात, मतभिन्नता असते; पण व्यक्तिगत सलोखा हा शक्यतो राखायचा असतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या समोर महाराष्ट्राचे त्या काळाचे जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar told the story of his prime ministership, name shortlist but.
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा