विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. अमेरिकेविरुद्ध आवाज उठवा. अमेरिका आपला बाप नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी केली.
अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना बेड्या घालून भारतात परत पाठवले होते. यावर आव्हाड म्हणाले, अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होत आहे. व्हिसाच्या बाबत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त करणारे आहे. भारतीयांना विमानातून कोंबून देशात पाठवण्यात आले.
पायात साखळदंड, हातात हातकड्या, हा प्रकार भारतीयांना हिणवणारा आणि अपमानीत करणार होता. अमेरिकेत जाऊन मोठे होणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसत आहे. बेड्यांविरुद्ध भारतीय बोलत नसू, अमेरिकेच्या अन्यायाविरुद्ध व्यक्त नाही झाल्यावर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. अमेरिकेविरुद्ध आवाज उठवा. अमेरिका आपली बाप नाही, असे म्हणत आव्हाड यांनी प्रातिनिधीक स्वरूपात हातात बेड्या घालून निषेध व्यक्त केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद केला जात आहे. ती पद्धत चुकीची आहे. आम्हाला व्यक्त होता आलेच पाहिजे. तो आमचा संवैधानिक अधिकार आहे.”
Jitendra Awhad Noutanki coming in the legislature area with shackles
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…